डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीमध्ये २४ टक्क्यांनी घट

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

मुंबई : राज्यभरात करोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख उताराला लागायला सुरुवात झाली, तसा लसीकरणाचा जोरही कमी होत आहे. डिसेंबरच्या तुलनेत तर जानेवारीमध्ये सुमारे २४ टक्क्यांनी घट झाली आहे. फेब्रुवारीमध्ये तर यात आणखी घट झाली असून प्रतिबंधात्मक मात्रेच्या लसीकरणालाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळले आहे.

नोव्हेंबरमध्ये करोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे राज्यभरात लसीकरणाचा जोरही कमी झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाचा वेग मंदावलेला. परंतु ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या रूपाबाबत चर्चा सुरू झाली तसा लसीकरणाने पुन्हा वेग घ्यायला सुरुवात झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तर प्रतिदिन सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाले. परंतु जसजसे ओमायक्रॉनचे स्वरूप सौम्य आहे, तसेच यामुळे फारसा धोकाही नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे लसीकरणाचा जोर जानेवारीपासून पुन्हा कमी झाला आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे ५ लाख २५ हजार आणि ५ लाख ३८ हजार लसीकरण झाले होते. परंतु या तुलनेत डिसेंबरमध्ये मात्र लसीकरण वेगाने वाढले. त्यामुळे या महिन्यात सुमारे ६ लाख २४ हजार लसीकरण केले गेले. जानेवारीत मात्र यात पुन्हा घट झाली आहे. जानेवारीमध्ये सुमारे ४ लाख ६९ हजार लसीकरण झाले असून डिसेंबरच्या तुलनेत सुमारे २४ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारीमध्ये पहिल्या पंधरवडय़ात दरदिवशी सुमारे दहा लाखांपर्यत लसीकरण केले जात होते. परंतु जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापासून लसीकरणामध्ये घट होऊन हे प्रमाण सहा लाखांपेक्षाही कमी झाले. फेब्रुवारीमध्ये तर हे प्रमाण सुमारे साडेतीन लाखांपर्यंत घटले.

राज्यभरात पहिल्या मात्रेचे लसीकरण सुमारे ९० टक्क्यांहून अधिक झाले असले तरी दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणाचे प्रमाण सुमारे ६७ टक्क्यांवर आहे.

१ कोटी नागरिकांची दुसऱ्या मात्रेकडे पाठ

राज्यातील १ कोटीहून अधिक नागरिकांनी नियोजित वेळ उलटून गेली तरी अद्यापही दुसरी मात्रा घेतलेली नाही. यात ९२ लाख कोव्हिशिल्डधारक तर सुमारे १७ लाख कोव्हॅक्सिनधारक नागरिकांचा समावेश आहे. दुसऱ्या मात्रेकडे पाठ फिरवणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर, बुलढाणा, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.

वर्धक मात्रेलाही  कमी प्रतिसाद

अत्यावश्यक आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी वर्धक मात्रा १० जानेवारीपासून सुरू झाली आहे. परंतु अजूनही याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत ११ लाख १६ हजार जणांनी ही मात्रा घेतली आहे. यात २ लाख ५४ हजार आरोग्य कर्मचारी, तर २ लाख ४४ हजार अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.