scorecardresearch

मुंबईत रुग्णवाढ; दिवसभरात ५१४ बाधित

नव्या करोना रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३६ हजार ८२४  झाली आहे.

मुंबईत रुग्णवाढ; दिवसभरात ५१४ बाधित

मुंबई : करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत बुधवारी वाढ नोंदविण्यात आली. दिवसभरात ५१४ रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असून, बुधवारी ६०४ रुग्ण करोनामुक्त झाले.

नव्या करोना रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३६ हजार ८२४  झाली आहे. त्यातील ७ लाख १३ हजार १७४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ४ हजार ६०२ उपचाराधीन रुग्ण आहेत. करोनामुक्तांचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबईत बुधवारी २९ हजार ८८६ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ९७ लाख ९९ हजार ८३९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2021 at 01:25 IST