नाट्यशौकिनांना महिनाअखेर मेजवानी

करोनामुळे डबघाईला आलेले बहुतांशी व्यवसाय सावरत आहेत. परंतु प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवर अवलंबून असलेले नाट्यक्षेत्र मात्र अद्याप सावरलेले नाही.

|| निलेश अडसूळ

तब्बल पंधराहून अधिक कलाकृतींचे सादरीकरण

मुंबई :  करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या नाटकांच्या प्रयोगांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने महिन्याअखेर पंधराहून अधिक कलाकृती रंगमंचावर येणार आहेत. त्यामुळे नाट्यशौकिनांना मेजवानी मिळणार आहे. येत्या महिन्याभरात नाट्यसृष्टीला चैतन्य लाभेल असा विश्वास रंगकर्मींकडून व्यक्त होत आहे.

करोनामुळे डबघाईला आलेले बहुतांशी व्यवसाय सावरत आहेत. परंतु प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवर अवलंबून असलेले नाट्यक्षेत्र मात्र अद्याप सावरलेले नाही. पहिल्या शिथिलीकरणात सुरू झालेले नाटक पुन्हा बंद पडल्याने मोठा आर्थिक फटका बसला. परंतु त्यानंतरही निर्माते मोठ्या धाडसाने नाटकांच्या प्रयोगांची जुळवाजुळव करीत आहेत.

पुन्हा चैतन्य…

राज्य सरकारच्या आदेशानुसार २२ ऑक्टोबरला नाटकाचा मखमली पडदा उघडला आणि नाट्यप्रयोग सुरू झाले. सुरुवातीला दोन, तीन नाटकांचे प्रयोग झाले. मात्र आता पंधराहून अधिक नाट्यकृती प्रेक्षकांसाठी सज्ज झाल्या आहेत. नोव्हेंबरअखेर रसिकांना नाटकांची ही मेजवानी मिळणार असून डिसेंबरमध्ये अनेक नव्या नाटकांची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

या महिन्यात…

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘तू म्हणशील तसं’, ‘स्त्री’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘सही रे सही’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘व्हॅक्युम क्लिनर’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘मराठी बाणा’, ‘तिला काही सांगायचंय’, ‘सुनेच्या राशीला सासू’ या कलाकृतींसह १५ नाटके नोव्हेंबरअखेरीस दाखल होणार आहेत.

१०० टक्के उपस्थितीला  परवानगी हवी…

नाटकाला येणारा प्रेक्षक सुजाण असून तो सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळे राज्य सरकारने आता आमची भूमिका समजून घेऊन १०० टक्के उपस्थितीला परवानगी द्यावी, अशी मागणी नाट्यसृष्टीतून होत आहे. 

डिसेंबरमध्ये…  ‘आमने सामने’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘इब्लिस’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘इशारों इशारों मे’, ‘धनंजय माने इथेच राहतात’ आणि ‘कुर्ररर’ या नव्या कलाकृतीने डिसेंबर सादर होणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection restriction great response to drama experiments akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या