‘ऑनलाइन शिक्षण सुरू करा’

समितीने शुल्काबाबत आठ आठवड्यांत निर्णय द्यावा व समिती जो निर्णय देईल त्याप्रमाणे शाळांनी  शुल्कामध्ये योग्य तो फेरबदल करावा.

मुंबई : करोना  काळात आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’च्या दादर येथील ‘आय. ई. एस, एशलेन इंग्लिश प्रायमरी स्कूल’ आणि ‘आय. ई. एस, मॉडर्न इंग्लिश स्कूल’ला दिले.  पालकांनी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे शुल्क सहा मासिक हप्त्यांमध्ये भरावे व जे शुल्क पालकांना अवाजवी वाटते, त्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीकडे सात दिवसांत दाद मागावी. समितीने शुल्काबाबत आठ आठवड्यांत निर्णय द्यावा व समिती जो निर्णय देईल त्याप्रमाणे शाळांनी  शुल्कामध्ये योग्य तो फेरबदल करावा. तसेच पालकांना समितीने दिलेला शुल्काबद्दलचा निर्णय मान्य नसेल तर त्यांना न्यायालयाकडे दाद मागण्याची मुभा असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट के ले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection start online learning education akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!