राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. अशातच मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भायखळातील महिलांसाठी असलेल्या तुरुंगात गेल्या १० दिवसांत सहा मुलांसह ३९ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने शनिवारी भायखळा महिला कारागृहात ३९ कैद्यांना करोनाची लागण झाल्यानंतर सील केले आहे.

सहाय्यक महापालिका आयुक्त ई वॉर्ड मनीष वाळुंजू यांनी सांगितले की १७ सप्टेंबर रोजी स्थानिक आरोग्य विभागाला कारागृहात अनेक रुग्णांना ताप येत असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर १९ सप्टेंबरला पहिल्यांदा तपासणी शिबीर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व कैद्यांची तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या १२० हून अधिक कोविड -१९ चाचण्या घेण्यात आल्या. ज्यामधून एकूण ३९ कैद्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. माझगाव परिसरातील पाटणवाला नगरपालिकेच्या शाळेत कैद्यांना सर्व कैद्यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Mobile thieves arrested 30 mobiles seized in kandivali
मुंबई : सराईत मोबाइल चोरांना अटक, ३० मोबाइल हस्तगत
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील

या कैद्यांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश असल्याने तिला खबरदारीचा उपाय म्हणून जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारागृहात परतलेल्या कैद्याला करोनाची लागण झाल्याने अन्य कैद्यांना लागण झाली असावी असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी परिसर सील केला आहे.

महिनाभरापूर्वी अशाच एका घटनेत, आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ शाळेत कर्मचाऱ्यासह २२ मुलांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर मानखुर्द बाल सुधाहर गृहामधील १८ मुलांना करोनाची लागण झाली होती.

मुंबईत गेल्या २४ तासात ४५४ करोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासांत ४५४ करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५८० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,१७,५२१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर मुंबईत गेल्या २४ तासांत पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ४६७६ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर ११९५ दिवसांवर गेला आहे.