मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्तांचे प्रमाण अधिक

रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी दोन हजार ७५ दिवसांवर पोहोचला आहे.

Corona Maharashtra Update
(प्रातिनिधिक छायाचित्र)

दिवसभरात २५२ जणांना संसर्ग

मुंबई : शहरात रविवारी नव्याने आढळून आलेल्या करोना रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक होती. मुंबईत रविवारी २५२ करोना रुग्ण आढळले, तर ३५२ रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला.

रविवारी सोमवारी नव्याने सापडलेल्या करोना रुग्णांमुळे बाधितांची एकूण संख्या सात लाख ५७ हजार ७०० झाली आहे. तर रविवारी ३५२ रुग्ण बरे झाल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या सात लाख ३५ हजार ९५४ झाली आहे. सध्या मुंबईत दोन हजार ९२७ उपचाराधीन रुग्ण आहेत.

मृत्यू झालेल्या तीनही रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तसेच मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. दोन रुग्णांचे वय हे ६० वर्षांवर होते, तर एका रुग्णाचे वय ४० ते ६० या वयोगटात होते.

रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी दोन हजार ७५ दिवसांवर पोहोचला आहे.

रविवारी मुंबईत २४ हजार ९३५ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण एक कोटी १६ लाख ५९ हजार १७२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. १७ इमारती प्रतिबंधित आहेत, तर बाधितांच्या संपर्कातील ८६२ नागरिकांचा रविवारी शोध घेण्यात आला.

ठाणे जिल्ह्य़ात ११८ बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी ११८ करोना रुग्ण आढळून आले. तर एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ११८ करोना रुग्णांपैकी ठाणे ४२, कल्याण-डोंबिवली २९, नवी मुंबई २७, मीरा भाईंदर १०, ठाणे ग्रामीण चार, अंबरनाथ तीन, बदलापूर दोन आणि उल्हासनगरमध्ये एक रुग्ण आढळून आला. तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एकाचा मृत्यू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus mumbai reports 252 new covid 19 cases zws