रुग्णवाढीचा सरासरी दर १.७२ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने ‘चाळिशी’ ओलांडली असून मुंबईतील रुग्ण दुपटीचा काळ बुधवारी ४१ दिवसांवर पोहोचल्याचा दावा पालिके ने के ला आहे. हाच कालावधी १६ जून रोजी ३० दिवस होता. तर रुग्णवाढीच्या टक्केवारीतही घट झाली असून आता मुंबईमधील रुग्णवाढीचा सरासरी दर १.७२ टक्के असल्याचे पालिके चे म्हणणे आहे.

मुंबईमध्ये ११ मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मुंबईत सातत्याने करोनाचा संसर्ग वाढतच आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या आणि दाटीवाटीने उभ्या इमारती, झोपडपट्टय़ा लक्षात घेता करोनाचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. मुंबईमध्ये २२ मार्च रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा काळ तीन दिवस होता. १५ मार्च रोजी तो पाच दिवस झाला. १२ मे रोजी तो १० दिवसांवर गेला. हा कालावधी २ जून रोजी २० दिवस, १६ जून रोजी ३० दिवस आणि २४ जून रोजी ४१ दिवसांवर पोहोचला आहे. ही बाब मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी

परिसर                दिवस

वांद्रे पूर्व                ९७

माटुंगा परिसर      ९१

भायखळा              ७६

कुर्ला                     ७३

फोर्ट-कुलाबा         ६९