भ्रष्टाचार प्रकरण : परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार?; सात सदस्यीय समिती करणार चौकशी

मुंबई पोलिसांच्या सात सदस्यीय समितीमध्ये पोलीस उपायुक्त स्तरावरील अधिकारी असतील.

Corruption case Parambir Singh problems will increase seven member committee will investigate
परमबीर सिंग

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीत. परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी बुधवारी सात सदस्यीय समितीची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त स्तरीय अधिकारी असतील.

काही दिवसांपूर्वी बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठजणांवर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असतानाच त्यापाठोपाठ आणखी एक खंडणीचा गुन्हा परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाचजणांवर ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, हे जुने प्रकरण पुन्हा उकरून काढले असल्याची चर्चा होती.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे आणि संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिक शाम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली होती.

आपल्या काकावर मोक्काची कारवाई करण्याची तसेच भावाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देऊन एकूण ४ कोटी ६८ लाख रुपयांसह दोन जमिनी बळाविल्याचा आरोप मिरा-भाईंदरमधील एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्यावर केला होता. या गुन्ह्यामुळे सिंग यांच्यासह मणेरे हे अडचणीत आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corruption case parambir singh problems will increase seven member committee will investigate abn