मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभाराची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५  कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यात बरेच हात गुंतले असून खरा सूत्रधार उघड होणे आवश्यक असल्याने या सर्व कामांची विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिकेचे नेतृत्व उद्धव व आदित्य ठाकरे करीत होते. त्यांच्या डोळय़ासमोर महापालिकेत टक्केवारीचा धंदा व मुंबईकरांची लूटमार सुरू होती, मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला गेला, हे या अहवालातून उघड झाले आहे, अशी टीका शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.  कॅगचा अहवाल हा केवळ २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ आक्टोबर २०२२ या कालावधीतील असून यामध्ये करोनाची कामे नाहीत.

Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद
Dp Campaign by aap
अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आता ‘डीपी मोहिम’; आप नेत्या म्हणाल्या, “आज दुपारपासून…”

हेही वाचा >>> आघाडीच्या एकजुटीसाठी काँग्रेसकडून ‘सावरकर’ मुद्दा बाजूला, सभांमधून भाजप-शिंदे गटाला प्रत्युत्तर

काही कामे निविदांविना तर काही निविदांपेक्षा अधिक देण्यात आली आहेत, अटीशर्तीचा भंग आहे. दहिसर येथील राखीव भूखंड अधिग्रहण व्यवहार व अन्य प्रकरणातील भ्रष्टाचार नमूद करून सॅप प्रणालीतील गैरव्यवहार आपण २००७ मध्ये उघड केला होता व आंदोलनही केल्याचे शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे शुक्रवारपासून महिनाभर टंचाई; ठाण्यालाही फटका

मुंबईत ‘सावरकर गौरवयात्रा’

मुंबईतील ३६ विधान सभांमध्ये  पाच दिवसांत सावरकर गौरवयात्रा काढण्यात येणार असून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनपटाचे देखावे, गीते व त्यांचे विचार यांबाबतचे चित्ररथ तयार करून ही यात्रा काढण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी केवळ भाषणांमध्ये सावरकरप्रेम दाखवण्यापेक्षा या सावरकर गौरवयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन शेलार यांनी केले.