कारवाईला स्थगिती देण्याची चोक्सीची न्यायालयात मागणी

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील देश सोडून पळालेला व्यावसायिक मेहुल चोक्सी याने उच्च न्यायालयात केली आहे.

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मागणीनंतर फरारी आर्थिक गुन्हेगार घोषीत करण्यासाठी विशेष न्यायालयाने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील देश सोडून पळालेला व्यावसायिक मेहुल चोक्सी याने उच्च न्यायालयात केली आहे. आपण भारतात येण्यास नकार दिलेला नाही. परंतु आरोग्याच्या कारणास्तव प्रवास करू शकत नसल्याचा दावाही चोक्सीने केला आहे.

या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यानंतर चोक्सीलाही फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याच्या मागणीसाठी ईडीने विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

दरम्यान वैद्यकीय उपचारांसाठी चोक्सीला अँटिग्वा आणि बर्बुडा येथे जाता यावे यासाठी जुलै 2021 मध्ये डॉमनिका येथील सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्यावेळी घातलेल्या अटींचा दाखला देत ईडीने केलेल्या अर्जावरील कारवाईला स्थगिती देण्यात  यावी, अशी मागणी चोक्सीच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. 

चोक्सीने भारतात येण्यास नकार दिला असे म्हणता येऊ शकत नाही. किंबहुना डॉमनिका न्यायालयाने भारतीय यंत्रणांच्या समक्ष चोक्सीबाबतचे आदेश दिल्याचेही चोक्सीच्यावतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड्. विजय अग्रवाल यांनी न्यायालयाला सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Court seeks stay of proceedings business mehul choksi pnb ferrari financial criminals akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या