scorecardresearch

अनिल देशमुख यांच्या मागणीवर आज निर्णय ; खासगी रुग्णालयात उपचारास परवानगी द्या

देशमुख यांच्यावर उपचार केलेल्या जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर्गत अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी देण्याच्या मागणीला अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सोमवारी विरोध करण्यात आला. तसेच जेजे रुग्णालयातही देशमुख यांच्यावर त्यांना हवे असलेले उपचार देण्यात येतील, असा दावा केला. देशमुख यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय विशेष न्यायालय मंगळवारी देणार आहे.

देशमुख यांच्यावर उपचार केलेल्या जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. असे असले त्यांच्या तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट केले होते, असा दावाही ईडीने विशेष न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रात केला आहे. जेजे रुग्णालयातील डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यासाठी सुसज्ज आणि पात्र आहेत. त्यामुळे देशमुख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, असेही ईडीने म्हटले आहे.

तर आपल्या निवडीचा डॉक्टर आणि रुग्णालयात उपचार घेणे हा देशमुख यांचा अधिकार असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी सोमवारी सुनावणीच्या वेळी केला.

तसेच देशमुख हे खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च स्वत: उचलण्यास तयार असतील तर त्यांना सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला जाऊ शकत नाही, असा दावाही देशमुख यांच्या वकिलांनी केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Court to decide on anil deshmukh s plea seeking treatment at private hospital on tuesday zws

ताज्या बातम्या