Covid: मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत असतानाच राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने वर जात असून गुरुवारी शहरात २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले

Covid, Omicron, Maharashtra Health Minister Rajesh Tope,
मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने वर जात असून गुरुवारी शहरात २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने वर जात असून गुरुवारी शहरात २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले आहेत. शहरात ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे रुग्णसंख्याही झपाटय़ाने वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून रुग्ण संख्येमध्ये सुमारे पाच हजारांची भर नव्याने पडत आहे. बुधवारी पालिकेने सुमारे ६० हजार चाचण्या केल्या असून यातून २० हजार १८१ रुग्ण नव्याने आढळले आहेत. मात्र यादरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

Coronavirus : मुंबईत २०,१८१ रुग्णांची नव्याने भर

मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येवर बोलताना त्यांनी सांगितलं की, “करोना रुग्णांची संख्या वाढतेय मात्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णालयात बेड्स शिल्लक आहेत. ऑक्सिजनची मागणी देखील वाढली नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही”. यासोबतच राज्यात अधिक निर्बंध लागू करायचे नसतील तर जनतेने सर्व नियमांचं पालन करावं असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं.

धारावीत दिवसभरात १०७ रुग्ण

धारावीमध्ये गुरुवारी एका दिवसात १०७ रुग्ण नव्याने आढळले आहेत. आत्तापर्यत धारावीमध्ये एका दिवसांत इतक्या मोठय़ा प्रमाणात रुग्ण प्रथमच आढळले आहेत. बुधवारी धारावीमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या ४० होती. एका दिवसात रुग्णसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे.

गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल होणे बंधनकारक

प्रसूतीच्या दोन आठवडे गर्भवती महिलेला करोनाची बाधा झाल्यास गृहविलगीकरणात ठेवता येणार नाही. त्यामुळे अशा महिलांना रुग्णालयात दाखल होणे आता बंधनकारक असणार आहे. विलगीकरणाबाबत नवीन नियम पालिकेने जोडलेला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid omicron maharashtra health minister rajesh tope appeals not to worry sgy

Next Story
“दर्यावर्दींना उद्ध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ..”; कोस्टल रोड प्रकल्पावरुन भाजपाचा इशारा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी