देशातील अन्य राज्यांमध्ये निर्बंध कठोर करण्यात आल्याने राज्यातही करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कोणते उपाय योजता येईल याबाबत चर्चा झाली. दरम्यान निर्बंध कडक करताना मुंबईची लाईफलाइन असणारी लोकल पुन्हा बंद होणार का? यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन?; दुकानांच्या वेळांवर निर्बंध, लोकलबाबतही होणार निर्णय

Buldhana, Police Seize 4 Pistols, Live Cartridges, Buldhana Madhya Pradesh Border, Buldhana Madhya Pradesh Border Operation, police operation, pistols seize in buldhana, buldhana crime news, crime news, buldhana news, lok sabha 2024,
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही असं स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी लावण्याचाही राज्य सरकारचा कोणता विचार नाही अशी माहिती दिली. तसंच तूर्तास लॉकडाउन लावण्याचा कोणताही विचार नसल्याचा पुनरुच्चार केला.

मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये रोज चर्चा –

मुख्यमंत्री आणि शरद पवार रोज चर्चा करतात. रोज सकाळी ७ वाजता त्यांची फोनवर सविस्तर चर्चा होते. यामुळे त्यांना निर्णय घेण्यासही मदत होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी अधिकची माहिती घेतली असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. योग्य ते निर्णय मुख्यमंत्री आणि शरद पवार चर्चेतून घेतील आणि त्याची अमलबजावणी आम्ही करु असं ते म्हणाले. लसीकरण वाढवलं पाहिजे यावर एमकत झाल्याची माहिती यावेळी राजेश टोपेंनी दिली.

सार्वजनिक कार्यक्रम, लग्नं यासंबंधीच्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी झाली पाहिजे. करोनाची रुग्णसंख्या नियंत्रित कशी करता येईल यासंबंधी शरद पवारांनी माहिती घेतली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. शरद पवारांनी आरोग्य विभागाकडून परिस्थिती समजून घेतली. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि नाही कराव्यात यासंबंधी माहिती घेतली असं ते म्हणाले.

लॉकाडउन, नाईट कर्फ्यू लावणार का?

यावेळी त्यांना लॉकाडउन, नाईट कर्फ्यू लावणार का? असं विचारण्यात आलं असता म्हणाले की, “या सर्व पर्यायांवर चर्चा झाल्या आहेत, मात्र त्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील”.

उपनगरीय रेल्वेतील गर्दी कायम ; कार्यालयात ५० टक्के उपस्थितीचे आदेश देण्याची प्रवासी संघटनांची मागणी

करोनाचे रुग्ण वाढत असताना मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील लोकल गाडय़ांना प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. सध्या ओमायक्रॉन संसर्गाचा वाढता वेग पाहता सरकारी, खासगी कार्यालयीन उपस्थिती ५० टक्के करावी आणि  अर्थचक्र न थांबता लोकल प्रवासासाठी वेळेची मर्यादा आणण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

रुग्णसंख्येत गेल्या आठवडय़ाभरापासून वाढ होत असून मुंबई उपनगरीय रेल्वेवरील वाढत्या गर्दीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. यापूर्वीही उशिराने वेगवेगळे निर्णय घेतल्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. आता लोकलमधील गर्दीवर नियंत्रणासाठी कार्यालयीन उपस्थिती ५० टक्के करण्याचे आदेश त्वरित काढावे, ही प्रवासी संघटनांची मागणी असल्याचे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी सांगितले.

प्रवासी वाढले

डिसेंबर २०२१ मध्ये मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर दररोज सरासरी २५ लाख ५८ हजार १५८ प्रवासी प्रवास करत होते. नोव्हेंबरमध्ये हीच संख्या सरासरी २३ लाख २० हजार होती. शनिवार १ जानेवारी २०२२ ला सध्या २२ लाख ३८ हजार असून ३ जानेवारीला मात्र ४१ लाख ४५ हजार असल्याची नोंद झाली आहे. पश्चिम रेल्वेकडूनही दररोजची उपनगरीय प्रवासी संख्येची माहिती दिली असता, नोव्हेंबर २०२१ मध्ये सरासरी १९ लाख १० हजार असलेली प्रवासी संख्या डिसेंबर २०२१ मध्ये २० लाख २१ हजार ६१५ झाली. जानेवारीत सध्या २१ लाख ७३ हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात आले.