scorecardresearch

मुंबईत कचऱ्यात पडलेलं पीपीई किट घालून पळून गेला करोना रुग्ण; रुग्णालयात एकच धावपळ

२१ वर्षीय तरुणाला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात केलं दाखल, पीपीई किट घालून फरार

Covid, Corona, Coronavirus, Lokmanya Tilak Terminus,
२१ वर्षीय तरुणाला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात केलं दाखल, पीपीई किट घालून फरार – प्रातिनिधिक फोटो (Express: Amit Mehra)

राज्यात एकीकडे करोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असताना मुंबईत करोना रुग्ण रुग्णालयातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २१ वर्षीय तरुणाने पळ काढल्याने रुग्णालयात एकच धावपळ सुरु झाली. दरम्यान पोलिसांनी या तरुणाला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून अटक केली आहे.

२१ वर्षीय तरुणाला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी या तरुणाने कचऱ्यात पडलेला पीपीई किट घालत रुग्णालयातून पळ काढला होता. यानंतर एमआरए पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसंच त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून त्याला अटक कऱण्यात आली. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याखाली त्याला अटक केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid positive man who ran away from a hospital has been arrested at lokmanya tilak terminus in mumbai sgy

ताज्या बातम्या