मुंबई : सलग सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने राज्यांतर्गत विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी – कोल्हापूर, एलटीटी – नांदेड विशेष रेल्वेगाडी आणि पनवेल – अमरावती अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या धावणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या धावतील. गाडी क्रमांक ०१०३९ विशेष रेल्वेगाडी २४ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.३० वाजता सुटेल आणि कोल्हापूर येथे त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०४० विशेष रेल्वेगाडी २६ जानेवारी रोजी कोल्हापूर येथून दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल.
या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले येथे थांबे देण्यात येतील. या रेल्वेगाडीला १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस – नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान चार विशेष रेल्वेगाडी धावतील. गाडी क्रमांक ०१०४१ विशेष रेल्वेगाडी २३ जानेवारी आणि २४ जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि नांदेड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०४२ विशेष रेल्वेगाडी २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेड येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा येथे थांबा असेल.
या रेल्वेगाडीला १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.
अमरावती – पनवेल – अमरावती दरम्यान अनारक्षित दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील. गाडी क्रमांक ०१४१५ विशेष रेल्वेगाडी २६ जानेवारी रोजी पनवेल येथून सायंकाळी ७.५० वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४१६ विशेष रेल्वेगाडी २२ जानेवारी रोजी अमरावती येथून दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पोहोचेल.
या रेल्वेगाडीला कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर आणि बडनेरा येथे थांबे आहेत. या रेल्वेगाडीला १६ शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी, द्वितीय श्रेणी चेअर कार आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन असतील.
