scorecardresearch

क्रेन चालकाचा मृत्यू; मेट्रो ६ मार्गाचा गर्डर बसवताना अपघात

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकरणाची दखल घेत कंत्राटदार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) सुरक्षा परीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

(प्रतिनिधिक छायाचित्र)

मेट्रो ६ मार्गाचा गर्डर बसवताना अपघात

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजूर मार्ग मेट्रो ६ अंतर्गत जेव्हीएलआर सिग्नलजवळ मेट्रोचा गर्डर बसविताना रविवारी सकाळी ६ वाजता क्रेन कोसळली़  यात क्रेन चालकाचा मृत्यू झाला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकरणाची दखल घेत कंत्राटदार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) सुरक्षा परीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  डीएमआरसीकडून मेट्रो ६ चे काम सुरू आहे. या कामाअंतर्गत जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील कंजूरमार्ग येथील जेव्हीएलआर सिग्नल येथे मेट्रोचे गर्डर बसविण्यात येत आहेत. त्यानुसार रविवारी सकाळी येथील खांब क्रमांक पी ५३४ आणि ५३५ यामध्येगर्डर बसविण्यात येत होते. यासाठी ५०० मेट्रीक टन वजनाच्या क्रेनचा वापर करण्यात येत होता. सेवा रस्त्यावरही क्रेन उभी करत तेथूनच काम सुरु होते. हे काम सुरू असतानाच अचानक यातील सेवा रस्त्यावरील माती खचली आणि क्रेन मातीत रुतून कलंडली. क्रेन कलंडत असल्याचे पाहून क्रेनचालक लवदीप रवींद्र सिंग (३५ वर्षे) याने उडी मारली. मात्र ज्या बाजूला त्याने उडी मारली त्याच बाजूला कलंडलेली क्रेन कोसळली आणि तो या क्रेनखाली अडकला. अडकलेल्या क्रेनचालकाला दुसऱ्या क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crane driver killed accident while installing girder of metro 6 route akp

ताज्या बातम्या