मिरा-भाईंदर महापौरांसह माजी आमदारावर गुन्हा

मिरा-भाईंदर शहरात गेल्या महिन्याभरापासून गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

करोना नियमांचे उल्लंघन

भाईंदर : करोना नियमांचे उल्लंघन करीत मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून आंदोलन केल्याप्रकरणी महापौर आणि माजी आमदारासह १०५ भाजप कार्यकर्त्यांवर काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा-भाईंदर शहरात गेल्या महिन्याभरापासून गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईला पालिकेतील सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप करीत अनेक पक्ष आंदोलन करीत होते. परंतु पाणी टंचाईला राज्यातील सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप करीत भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली मिरा रोड येथील सिल्वर पार्क परिसरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात करोना नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यात आली होती. त्यामुळे आंदोलक माजी आमदार नरेंद्र मेहता, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृह नेते प्रशांत दळवी आणि अन्य १०५ भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crime against former mla including mira bhayander mayor akp

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या