मुंबई : भिवंडीतील गृह प्रकल्पातील १३ सदनिका विकण्याच्या बहाण्याने एका विकासकाची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भांडूप पोलिसांनी नागपूरमधील दोन यूट्युबर बंधूंसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भांडूप पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भांडुप येथील रहिवासी आलम खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी इक्लाक शहा, अनिस शहा यांच्यासह यूट्युबर बंधू पुरब दर्डा आणि सौरभ दर्डा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, यावर्षी मार्च महिन्यात भांडुप येथील मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवहार करणारा दलाल इक्लाक आणि त्याचा भाऊ अनिस यांनी तक्रारदाराची भेट घेतली होती. त्यांनी नागपूर येथील दोन भाऊ, पुरब आणि सौरभ दर्डा यांनी भिवंडीतील तुलशी भागात गृह प्रकल्पासाठी एक एकर जागा खरेदी केली असून ते सदनिकांसाठी ग्राहक शोधत आहेत. त्या सदनिका स्वस्त असून त्या खरेदी करणाऱ्याला चांगला फायदा होऊ शकेल, असे सांगितले. खान यांनी नंतर भांडुप येथील इक्लाकच्या कार्यालयात शहा आणि दर्डा बंधुंसोबत प्रकल्पाचा तपशील समजून घेण्यासाठी भेट घेतली. बैठकीत पुरब दर्डाने खान यांना सातबारा उतारा, नकाशे आणि इतर कागदपत्रे दाखवली. दर्डा याने खान यांना बाजारभावाच्या अर्ध्या म्हणजे दोन हजार रुपये चौरस फूट दराने सदनिका विकण्याचा प्रस्ताव ठेवला. इक्लाकने खानला हा व्यवहार फायद्याचे असल्याचे पटवून दिले.

mahada house prices increased instead of decreasing
म्हाडा घरांच्या किमतीत वाढ, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ऐनवेळी किंमतीत बदल करण्याची वेळ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन १६ कोटींच्या शेअर्सची परस्पर विक्री
case against three transport inspectors for corruption
मुंबई : भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तीन परिवहन निरीक्षकांविरोधात गुन्हा
bombay hc impose fine of two lakhs to accused and victim while canceling the rape case
बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
High Court, CID Investigation, Ritu Malu, Hit and Run, Nagpur Police, Tehsil Sub Inspector Allegations, Police Protection, Medical Examination, CCTV Footage, latest news
रामझुला हिट अँड रन प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढला….आता अखेर सीआयडीकडे…
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी

हेही वाचा >>>मुंबई: खासदाराचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून पैसे उकळणारा गजाआड

खात्री झाल्यावर खानने प्रकल्पात १३ निवासी सदनिका खरेदी करण्याचे ठरवले. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान खान यांनी आरोपींना एक कोटी ३० लाख रुपये दिले आणि त्यांच्यात सामंजस्य करारही (एमओयू) झाला. काही रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली, मात्र त्यांनी सांगितलेल्या वेळेत सदनिका वितरित करण्यात अपयशी ठरल्यानंतर खान यांनी इक्लाक आणि इतरांची चौकशी केली, त्यावेळी प्रकल्पाच्या काही परवानग्या अद्याप येणे बाकी असल्याने काम सुरू होऊ शकले नाही, असे सांगितले. खानला संशय आला. त्यांनी संबंधित जमिनीबाबत स्वतंत्र चौकशी केली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आरोपींनी दाखवलेला सातबारा उतारा बनावट होता. ती जमीन त्रयस्थ व्यक्तीच्या नावावर होती. त्यावेळी खानने पैशांची मागणी केली. त्यांना पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत. अखेर त्यांनी भांडूप पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०६ (विश्वासघात), ४२० (फसवणूक) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यूट्युबर बंधूंचा याप्रकरणातील सहभाग अद्याप स्पष्ट नाही. कदाचित मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्या दोन दलालांनी त्यांचे नाव पुढे केल्याचा संशय आहे. याप्रकरणी तपास प्राथमिक स्वरूपात असून जमा करण्यात आलेल्या रकमेच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत.