प्रतीक्षा सावंत

मुंबई : घरी ठेवलेल्या, साठवलेल्या दोन हजाराच्या नोटा खपवण्यासाठी नागरिकांची गडबड सुरू झाली आहे. नोटा बँकेत जमा करण्याऐवजी अनावश्यक किंवा अतिरिक्त खरेदीचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. परिणामी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, बॅग, पर्सेस, दागिने, घडय़ाळे यांच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.  

Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये पूर्वसूचनेविना ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अचानक रद्द केल्या. त्यावेळी बँकेत जाऊन नोटा बदलून घेताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पुन्हा तशी स्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून दोन हजाराची नोट व्यवहारातच नोटा खपवण्याचा बहुतेकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये गेल्या काही दिवसांत गर्दी वाढल्याचे चित्र आहे. नेहमी लागणाऱ्या पण साठवून ठेवता येतील अशा वस्तूही खरेदी केल्या जात असून दोन हजारांच्या नोटांमधून देयके अदा केली जात आहेत.

रांगेतील दहापैकी सहा ते सातजण दोन हजाराची नोट देतात, असे डी मार्टमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. एरवी महिन्या-दोन महिन्याचे सामान खरेदी करणारेही अधिकची खरेदी करत असल्याचे निरिक्षण दुकानदारांनी नोंदवले. दोन हजारांच्या नोटा देऊन सोने-चांदीच्या खरेदीतही झपाटय़ाने वाढ झाली आहे. त्याशिवाय कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, महागडी घडय़ाळे यांची खरेदीही लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. अनेक तरुणी दिवस २ हजारच्या नोटा खपविण्यासाठी ४ ते ६ हजार रुपयांपर्यंतचे मेकअपचे साहित्य खरेदी करत असल्याचे नायका स्टोअरमधील एका कर्मचाऱ्याने सांगितले. गेल्या तीन दिवसांत २ हजारच्या नोटांमार्फत खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. एका ग्राहकाने तब्बल ५० नोटा देऊन १ लाख रुपयांच्या साडय़ा खरेदी केल्याचे दादरमधील रंगोली साडी सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता २ हजाराच्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय काही विक्रेते आणि हॉटेलमालकांनी घेतला आहे.

डिजिटल व्यवहारांत घट

गेल्या काही वर्षांपासून विशेषत: करोना काळात नागरिकांना डिजिटल व्यवहारांची सवय लागली होती. आता मात्र, मोठय़ा रक्कमेची खरेदी रोखीने करण्याचे प्रमाण वाढले आहे. २ हजारांच्या नोटा देऊन खरेदी वाढल्याचे दादरमधील सुविधा शोरूमचे व्यवस्थापक आर. के. सिंग यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांत दीड ते दोन लाख रुपयांचे चलन दोन हजाराच्या नोटेच्या स्वरूपात जमा झाल्याचे कृष्णा इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकांनी सांगितले. पूर्वी दिवसाला २ हजाराच्या ६ ते ९ एवढय़ाच नोटा पेट्रोल पंपावर येत होत्या. आता हा आकडा ६० ते ७० नोटांवर गेला आहे. मालकांकडून कोणत्याही विशेष सूचना न आल्यामुळे ग्राहकांना नकारही देता येत नाही, असे दादरच्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी अरविंद तिवारी यांनी सांगितले. क्रेडिट कार्ड, मोबाईलची बिलेही रोखीत भरण्यासाठी नागरिक जात आहे. दिवसातून एखादाच ग्राहक बिल भरण्यासाठी प्रत्यक्ष येत असे. सध्या मात्र दहा ते बाराजण रोखीने बिल भरत असल्याचे ‘एअरटेल’मधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

खरेदी किरकोळ, नोट मात्र दोन हजारांची

अगदी लहान-सहान खरेदीसाठीही २ हजारच्या नोटा घेऊन येणाऱ्या ग्राहकांमुळे विक्रेत्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी आता एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या वस्तू खरेदी केल्या तरच दोन हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे दुकानदारांकडून सांगितले जात आहे.

विक्रेत्यांच्या मनातील शंका

  • जास्त प्रमाणात २ हजाराच्या नोटा बँका स्वीकारतील का?
  • जास्तीत जास्त किती रकमेपर्यंतच्या नोटा स्वीकारल्या जातील?
  • बँकेत पूर्वीप्रमाणे रांग लावावी लागेल का?
  • बँकेने नोटा स्वीकारल्याच नाहीत तर काय करायचे?
  • नोटा बदलीचा कालावधी अचानक कमी केला तर?