केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या समुद्रात कार्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं होतं.  त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले होते. तसेच या क्रूझमधून अभिनेता शाहरुख खानचा मुलगी आर्यनसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा यांचा समावेश होता. या प्रकरणातील एका आरोपी तरुणीने सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून ड्रग्स आणल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी तरुणीने सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून ड्रग्स आणले होते, असं एनसीबी अधिकाऱ्यांना तपासादरम्यान आढळलं आहे. तसेच अरबाज मर्चंटच्या बुटातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर आर्यनव्यतिरिक्त इतरांनी लेन्स कव्हर, अंडरवेअरमध्ये ड्रग्स लपवले होते. तर मुलींनी सॅनिटरी पॅड्स, पर्सचे हँडल यात ड्रग्स लपवून ठेवले होते, अशी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुपूर सारिकाने सॅनिटरी नॅपकीनमध्ये ड्र्ग्स लपवले होते.

Drugs Case : सॅनिटरी पॅड्स ते अंडरवेअर; कोणी, कुठे लपवले होते ड्रग्स?

नुपूर सारिका ही दिल्लीत फॅशन डिझायनिंगचे काम करते. मिळालेल्या माहितीनुसार, नुपूरला मोहकने ड्रग्ज दिले होते, जे तिने फार हुशारीने सॅनिटरी पॅडमध्ये लपवले होते. तसेच मोहक जसवाल या तरुणीने मुंबईतून एका स्थानिक व्यक्तीकडून ड्रग्स खरेदी केले होते. त्यानंतर तिने नुपूरला ते सॅनिटरी पॅड्समध्ये लपवण्यासाठी सांगितले होते. ‘पार्टीत तू मला हे दे,’ असे तिने नुपूरला सांगितले होते. मात्र सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवण्याची ही युक्ती फोल ठरली आणि एनसीबीच्या कारवाईत हे ड्रग्स सापडले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cruise drugs party case nupur sarika carried drugs in sanitary napkin says ncb hrc
First published on: 10-10-2021 at 10:41 IST