scorecardresearch

Premium

‘सीएसएमटी’ ते नागपूर, सोलापूर विशेष रेल्वे

मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी सुविधेसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सीएसएमटी – नागूपर, सोलापूरदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.

irctc news indian railways train ticket booking tips How to get Confirmed Train Ticket tatkal ticket 2023 paytm
विशेषत: सणासुदीच्या काळात तर कन्फर्म तिकीट मिळणेच अशक्य असते. यावेळी काय करावे सुचत नाही. (संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता )

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी सुविधेसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सीएसएमटी – नागूपर, सोलापूरदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.मध्य रेल्वेवरील सीएसएमटी – नागपूर अतिजलद एकमार्गी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०२१०३ सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी २ डिसेंबर रोजी सीएसएमटी येथून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता पोहोचेल.

या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात येणार आहे. या रेल्वेगाडीला एकूण १७ डबे असून एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी अशी संरचना असेल.सीएसएमटी – सोलापूर अतिजलद एकमार्गी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०२१०५ एकेरी विशेष रेल्वेगाडी ३ डिसेंबर रोजी सीएसएमटी येथून रात्री १२.३० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी सकाळी ८.१० वाजता पोहोचेल.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
Special trains for Anganwadi Yatra
मुंबई : आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वेगाड्या
Kapote parking lot
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील कपोते वाहनतळ वाहनांसाठी सज्ज, प्रवाशांची मागील चार वर्षांपासूनची गैरसोय दूर
Inauguration of Palghar to Gujarat phase of Dedicated Freight Corridor Project
मालगाड्यांसाठी मार्ग सुसाट; समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाचे आठवडा खेरीज उद्घाटन

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Csmt to nagpur solapur special railway amy

First published on: 30-11-2023 at 05:28 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×