Cyclone Tauktae: पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

दुर्घटनेत आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू तर ३५ जणांचा शोध अद्याप सुरु

फोटो सौजन्य- PTI

तौते चक्रीवादळाच्या दरम्यान पी-३०५ हा तराफ्यावरील कामगारांचा जीव धोक्यात घालल्याबद्दल कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी-३०५ बार्जच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या यलोगेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३०४(२),३३८,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तौते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना मोठा तडाखा बसला. वादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ हा तराफा बुडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३५ जणांचा शोध अद्याप सुरु आहे.

ओएनजीसी कंपनीसाठी काम करणारे पी-३०५ हे बार्ज तौते चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतरही समुद्रातच होते. १६ मे रोजी मध्यरात्रीनंतर बार्जचा नांगर तुटला. त्यानंतर १७ मे रोजी त्यांनी मुंबईच्या डिजिटल कम्युनिकेशन (डीजीसीओएम) केंद्राला याची माहिती दिली होती त्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले. तटरक्षक दल , भारतीय नौसेना यांनी बचावकार्य सुरू केले. पहाटेच्या दरम्यान त्यांना बार्जची माहिती मिळाली.

पी-३०५ बार्जचा नांगर हा तौते चक्रीवादळाच्या आधीच तुटला होता असे सांगण्यात येत आहे. डीजीसीओएमने यासंदर्भात ओनजीसीचे प्रवक्ते हरीश अवल यांना कळवले असता त्यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. अफकॉन्सने त्यांची माणसे समुद्रात पाठवली होती अशी माहिती हरीश अवल यांनी दिली. अफकॉन्स ही कंपनी ओनजीसीसाठी काम करते. अफकॉन्सची माणसे त्या बार्जवर काम करत होती. मात्र दोन्ही कंपन्यांनी बार्जची मालकी असणारे डूरमास्ट एंटरप्राइजेज आणि बार्जच्या कॅप्टनला या घटनेसाठी जबाबदार ठरवले आहे.

ओनजीसेचे ९९ बार्ज त्यावेळी समुद्रात होते. त्यापैकी वादळामुळे ९४ हे परत आले होते. पण पी-३०५ हे परत आले नाही. तटरक्षक दलाने वादळाची सूचना बार्जला दिली होती असे ओएनजीसीने सांगितले. त्यावर आम्ही मासे पकडणारे नसून तेल उत्खनन करणारे असल्याचे सांगण्यात आल्याचे प्रवक्ते हरीश अवल यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cyclone tauktae p 305 barge captain and others charged with culpable homicide abn

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या