मृतांचा आकडा ४९ वर

२३ कर्मचाऱ्यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडले.

‘पी ३०५’ तराफ्यावरील २६, तर ‘वरप्रदा’वरील ११ बेपत्ताच

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात बुडालेल्या ‘पी ३०५’ तराफ्यावरील एकूण ४९ जणांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडले. या तराफ्यावरील २६ जण, तर वरप्रदा या नौकेवरील ११ जण अद्यापही बेपत्ता आहेत.

तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केल्याने बॉम्बे हायनजीकच्या तेल विहिरींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तयार केलेला ‘पी ३०५’ हा तराफा समुद्रात बुडाला. या तराफ्यावरील २६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह बुधवारी रात्रीपर्यंत मिळाले होते. आणखी २३ कर्मचाऱ्यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडले. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा ४९ झाला आहे. अद्यापही २६ कर्मचाऱ्यांचा शोध लागू शकलेला नाही. नौदलाची शोधमोहिम सुरू आहे. आयएनएस कोलकाता ही युद्धनौका बुधवारी रात्री उशिरा बचावलेले कर्मचारी आणि मृतदेह घेऊन मुंबईच्या किनाऱ्यावर आली. आयएनएस बियास ही युद्धनौका आणखी काही मृतदेह घेऊन गुरुवारी मुंबईत परतली. या तराफ्याशिवाय वरप्रदा या नौकेलाही जलसमाधी मिळाली. त्यावरील २ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदलाला यश आले असून, उर्वरित ११ कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत.

नातलगांची गर्दी

‘पी ३०५’ ही तराफा आणि वरप्रदा ही नौका बुडाल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांच्या परराज्यातील नातलगांनी मुंबईत धाव घेण्यास सुरूवात केली. दोन दिवस उलटूनही कर्मचाऱ्यांचा अद्यापही थांगपत्ता न लागल्याने नातलगांनी जे जे रुग्णालयातील शवागृहाबाहेर गुरुवारी गर्दी केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cyclone tauktae update 49 death arabian sea akp

ताज्या बातम्या