दाभोलकर, पानसरे हत्येच्या तपासावरून हायकोर्टाने पुन्हा तपास संस्थांना फटकारले

२३ जूनपर्यंत या दोन्ही हत्येच्या तपासात काय प्रगती झाली, याचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश

अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्यांचा शोध लावण्यात अपयशी ठरलेल्या तपास पथकांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा धारेवर धरले. २३ जूनपर्यंत या दोन्ही हत्येच्या तपासात काय प्रगती झाली, याचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटीला दिलेले आहेत.
या प्रकरणी तपास करताना कोणाचा दबाव येत आहे का, येत असेल तर त्याचीही माहिती न्यायालयाला द्या, असे स्पष्ट करीत न्यायालयाने अहवालामधून नवीन काहीच माहिती पुढे येत नसल्याबद्दल तीव्र शब्दांत खेद व्यक्त केला. गेल्याच आठवड्यात या प्रकरणावरून उच्च न्यायालयाने दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडणार की केवळ स्मृतिदिनच करत बसणार असा टोला तपास संस्थांना लगावला होता.
दाभोलकर तसेच पानसरे कुटुंबीयांनी केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मारेकऱ्यांचा माग लावण्याऐवजी दोन्ही हत्या प्रकरणांतील साधम्र्य शोधण्यात गुंतलेल्या सीबीआयला आणि विशेष तपास पथकाला न्यायालयाने धारेवर धरले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dabholkar pansare murder case high court once again criticized cbi sit

ताज्या बातम्या