scorecardresearch

मुंबई : दादरमधील जे. के. सावंत मार्ग रंगीबेरंगी चित्रांनी सजला, महानगरपालिकेच्या उपक्रमात विद्यार्थ्यांची कलाकृती

मुंबई महानगरपालिकेच्या जी/ उत्तर विभागाने ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने जे. के. सावंत मार्गावरील पदपथालगतच्या भिंतीचे सुशोभीकरण केले आहे.

मुंबई : दादरमधील जे. के. सावंत मार्ग रंगीबेरंगी चित्रांनी सजला, महानगरपालिकेच्या उपक्रमात विद्यार्थ्यांची कलाकृती
दादरमधील जे. के. सावंत मार्ग रंगीबेरंगी चित्रांनी सजला (image – लोकसत्ता टीम )

मुंबई : दादर पश्चिमेकडील जे. के. सावंत मार्गावरील भिंती सध्या येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत या भिंतींवर विविध विषयांवरील चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे, हा परिसर आकर्षक बनला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या जी/ उत्तर विभागाने ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने जे. के. सावंत मार्गावरील पदपथालगतच्या भिंतीचे सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे, प्लाझा चित्रपटगृहाकडून दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भिंती लक्षवेधी ठरत आहेत.

हेही वाचा – मुंबई : “नगरसेवकांची संख्या कायद्याने निश्चित, लोकसंख्येनुसार कमी-जास्त करण्याचा प्रश्नच नाही”, महाधिवक्त्यांचा न्यायालयात दावा

भिंती सुशोभित करण्यासाठी वंसतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड व्हीज्युअल आर्ट्सच्या ५० विद्यार्थ्यांनी या भिंतींवर चित्र रेखाटल्याची माहिती जी उत्तर विभागाच्या घनकचरा विभागातील अधिकारी इरफान काझी यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : “नगरसेवकांची संख्या कायद्याने निश्चित, लोकसंख्येनुसार कमी-जास्त करण्याचा प्रश्नच नाही”, महाधिवक्त्यांचा न्यायालयात दावा

येथील ८० मीटर लांब आणि २ मीटर उंच भिंतीवर विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे रेखाटली आहेत. या मुलांना चित्र रेखाटण्यासाठी महानगरपालिकेने विषय दिले होते. त्यात निसर्ग, पर्यावरण, स्वच्छता आदी सामाजिक विषयांचा समावेश होता. तसेच, चित्र काढण्यासाठी लागणारे साहित्यही महानगरपालिकेने उपलब्ध केले होते. या उपक्रमासाठी अन्य महाविद्यालयांशी संपर्क साधण्यात येणार आहे. दादर, माहीम परिसरातील आणखी काही भिंतींवर आकर्षक अशी चित्रे रेखाटण्यात येणार आहेत, असे काझी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 13:11 IST

संबंधित बातम्या