scorecardresearch

Dahi Handi 2022 : मुंबईत विविध ठिकाणी १२ ‘गोविंदा’ जखमी; रूग्णालयात उपचार सुरू

Dahi Handi 2022 Celebration: दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी मोठी गर्दी केली असून, उत्साह ओसंडून वाहत आहे

Dahi Handi 2022 : मुंबईत विविध ठिकाणी १२ ‘गोविंदा’ जखमी; रूग्णालयात उपचार सुरू
(संग्रहीत छायाचित्र)

Dahi Handi 2022 Celebration Mumbai : मुंबईत तब्बल दोन वर्षानंतर दहीहंदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली आहे. सकाळपासून आतापर्यंत विविध ठिकाणी १२ गोविंदा जखमी झाले आहेत.

विविध शासकीय आणि पालिका रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार नायर रुग्णालयात पाच, केईएम, जोगेश्वरी ट्रामा, कांदिवली डॉ आंबेडकर रुग्णालय याठिकाणी प्रत्येकी एक जण दाखल झाले आहेत.

वरळीच्या पोद्दार रुग्णालयात चार जण दाखल झाले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या १२ जणांपैकी ५ जणांना उपचार करून सोडून दिले तर उर्वरित ७ जण रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या