scorecardresearch

पोलखोल: “तू कोण आहेस परमिशन मागणारी?”, भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी सभा घेत साधला निशाणा

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजपा ठिकठिकाणी पोलखोल सभेचं आयोजन करत आहे. मात्र या सभांना शिवसेनेकडून विरोध होत असल्याचं दिसत आहे.

Dahisar_Polkhol
पोलखोल: "तू कोण आहेस परमिशन मागणारी?", भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी सभा घेत साधला निशाणा

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजपा ठिकठिकाणी पोलखोल सभेचं आयोजन करत आहे. मात्र या सभांना शिवसेनेकडून विरोध होत असल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दहिसरमध्ये आमदार मनिषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलखोल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सभेपूर्वी शिवसेना नगरसेविका आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी सभेच्या ठिकाणी जात परवानगी घेतली आहे का? असा प्रश्न विचारत स्टेज काढण्यास सांगितलं. यावेळी काही शिवसैनिकांनी स्टेज काढण्यास सुरुवात केली. मात्र यानंतर यावरून चांगलंच राजकारण तापलं. भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी सभेत परवानगीचं कागदपत्रं दाखवत दहिसर विभागातील भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. शिवसेनेच्या माध्यमातून कशाप्रकारे वसुली केली जाते आणि यात कोण कोण कसं सहभागी आहे. याबाबत भरसभेत लेखाजोखा मांडला.

“तुम्ही नेत्यांना खूश करण्यासाठी परमिशन आहे का विचारता? तू कोण आहेस परमिशन मागणारी? तुला परमिशन मागयची आहे तर पोलिसांकडे मागा, सर्व ऑफिशियल परमिशन घेणारी भारतीय जनता पार्टी आहे. लोकांना घराघरात जाऊन दमदाटी केली. कुणीही मीटिंगला यायचं नाही. जनता तुमच्या दादागिरीला घाबरणारी नाही.” असा निशाणा आमदार मनिषा चौधरी यांनी साधला. तसेच काही शिवसैनिक असलेल्या कार्यकर्त्यांची नावे घेत वसुली करत असल्याचा आरोप आमदार मनिषा चौधरी यांनी केला.

दहिसरमधील पोलखोल सभेपूर्वी शिवसेना नगरसेविका आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी सभेला परवानगी नसल्याचं कारण देत सभा होऊ देणार नसल्याचं पवित्रा घेतला होता.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राजकारण चांगलंच तापलं आहे. पोलखोल सभेवरून शिवसेना आणि भाजपामध्ये येत्या काही दिवसात कलगीतुरा आणखी रंगण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dahisar polkhol sabha mla manisha chaudhari on shivsena asking permission rmt

ताज्या बातम्या