केसरभाई इमारतीचा कोसळलेला भाग अनधिकृत, आमचा संबंध नाही – म्हाडा

मात्र, ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

म्हाडाची माहिती

डोंगरी भागातील केसरभाई इमारत ही म्हाडाच्या कार्यक्षेत्रातील असून ती कोसळलेली नाही तर या इमारतीच्या मागील अनधिकृतरित्या बांधलेला भाग कोसळला आहे. हा कोसळलेला भाग म्हाडाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे स्पष्टीकरण म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. मात्र, ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

गडपाले यांच्या माहितीनुसार, ‘म्हाडाचा घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील डोंगरी येथील २५/C केसरभाई ही उपकरप्राप्त इमारत कोसळलेली नसून आजही सद्यस्थितीत उभी आहे. ही इमारत वास्तव्यास धोकादायक असल्याने सन २०१८ साली मंडळाने या इमारतीतील रहिवाशांना व्हेकेशन नोटीस देऊन ती रिकामी करवून घेतली आहे व सद्यस्थितीत ही इमारत उभी आहे.’

‘मात्र, आज घडलेल्या दुर्घटनेमध्ये २५/C केसरभाई इमारतीच्या मागील अनधिकृत बांधकामाचा भाग कोसळला आहे. हे अनधिकृत बांधकाम उपकरप्राप्त नसल्याने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कार्यक्षेत्रात मोडत नाही, त्यामुळे या पडलेल्या बांधकामाला म्हाडा जबाबदार नाही’, असे गडपाले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

डोंगरीतील केसरभाई या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून मृत्यू झालेल्यांचा आकडा आता पाचवर पोहोचला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल असून बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे ४० जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dangari accident the collapsed part of the building is unauthorized mhada is not responsible for that says mhada aau

ताज्या बातम्या