उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी | Dasara Melava 2022 Mumbai Police on Numbers of people attended rally by CM Eknath Shinde Shivsena Uddhav Thackeray sgy 87 | Loksatta

Dasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी

Shinde vs Thackeray : शिवतीर्थ की BKC… कुठे जमले जास्त समर्थक? पोलिसांनी दिली माहिती

Dasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी
शिवतीर्थ की BKC कुठे जमले जास्त समर्थक? पोलिसांनी दिली माहिती

मुंबईत बुधवारी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्क मैदानात तर शिंदे गटाची बीकेसीमधील मैदानात सभा पार पडली. दोन्ही सभांना मोठ्या संख्येने समर्थकांनी गर्दी केली होती. दरम्यान, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार पोलिसांनी कोणाच्या सभेला जास्त गर्दी होती यासंबंधीची आकडेवारी दिली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

शिवसेनेने २.५ लाख लोकांनी मेळाव्याला उपस्थिती लावल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे तीन लाख लोक शिंदेंच्या मेळाव्याला उपस्थित होते असं सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांच्या अंदाजानुसार उद्धव ठाकरेंच्या सभेला एक लाख तर एकनाथ शिंदेंच्या सभेला दोन लाख लोक उपस्थित होते. शिवाजी पार्क मैदानाची क्षमता ८० हजार, तर बीकेसीमधील मैदानाची १ लाख क्षमता आहे.

विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?

शिंदेंच्या सभेतून लोकांचा काढता पाय?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुरुवात होताच ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी काढता पाय घेतला असा शिवसेनेचा दावा आहे. शिंदेंच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण अंतिम टप्प्यात पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली होती. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी अवघ्या पाऊण तासामध्ये आपंल भाषण संपवलं.

पश्चिम रेल्वेच्या डब्यांमध्ये लाईव्ह कव्हरेज

बुधवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना डब्यात लावण्यात आलेल्या स्क्रीनवर शिंदे गटाच्या मेळाव्याचं लाईव्ह कव्हरेज दिसलं तेव्हा आश्चर्य वाटलं. आमच्या लक्षात आणून दिल्यानंतर काही वेळातच हे कव्हरेज थांबवण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेने सांगितलं आहे. तसंच कंत्राटदाराकडून याप्रकरणी स्पष्टीकरण मागण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे. फक्त १० ते १५ मिनिटांसाठी हा कार्यक्रम लाईव्ह होता असा त्यांचा दावा आहे.

Dasara Melava: मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरु असतानाच BKC मैदानातील लोक उठून निघून गेले; रिकाम्या खुर्च्यांचे Video Viral

पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला एका राजकीय पक्षाची सभा लोकलच्या डब्यांमध्ये लाईव्ह दाखवल्याची माहिती मिळाली. आम्ही यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नव्हती. आमच्या करारानुसार, राजकीय स्वरुपाची कोणतीही जाहिरात किंवा माहिती दाखवण्यास निर्बंध आहेत”.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आनंद दिघेंच्या संपत्तीवरून मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संबंधित बातम्या

Maharashtra Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
“कर्नाटक पाकिस्तानात नाही आणि महाराष्ट्र…”, सीमावादावरून सुषमा अंधारे आक्रमक, भाजपावर गंभीर आरोप
“त्यांची मुख्यमंत्रीपदाची हौस…”, महिला मुख्यमंत्रीबाबत उद्धव ठाकरेंच्या विधानावर चित्रा वाघ यांचा टोला
बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
VIDEO: “शेळीने उंटाचा मुका…”, ‘सभा उधळून लावू’ म्हणणाऱ्या मनसे नेत्यांना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
FIFA WC 2022: मोठा अपसेट! पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा पराभव करत मोरोक्कोने गाठली पहिल्यांदाच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
पुण्यातील मनसेने कर्नाटकच्या गाड्यांना फासले काळे; जय महाराष्ट्र, जय मनसे लिहून नोंदविला निषेध
“हातावर हात ठेऊन शांत बसणार नाही”, नोटाबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट म्हणाले…