दसऱ्यानिमित्त मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क तसेच वांद्रे-कुर्ला संकुलामधील एमएमआरडीच्या मैदानावर अनुक्रमे उद्धव ठाकरे ठाकरेंच्या गटाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचा मेळावा पार पडत आहे. सायंकाळी पाच वाजताची वेळ दोन्ही मेळाव्यांसाठी कार्यकर्त्यांना देण्यात आली होती. मात्र या मेळाव्यांमधील प्रमुख आकर्षण असणारी भाषणं ही लांबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाषणं उशीरा सुरु होतील अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: शिंदे गट आणि ठाकरे गट समर्थक मुंबईत आमने-सामने आल्यास…; विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “एकमेकांच्या समोर…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावरून घेतला आहे. सायंकाळी साडेपाचला नंदेश उमप यांच्या गाण्याने मेळाव्याला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं आहे. यानंतर शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे, आमदार शहाजीबापू पाटील, मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री रामदास कदम, माजी खासदार आनंदराव आडसूळ, विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची भाषणं होतील.

नक्की वाचा >> ‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल

या मान्यवरांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री शिंदे भाषण करतील असा अंदाज वर्तवला जात आहे. साधारपणे सायंकाळी सात वाजता शिंदे बीकेसी मैदानावर दाखल होतील. यानंतर आठ ते सव्वाआठ या वेळेत ते भाषणासाठी उभे राहतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिंदे गटातील आमदारांसोबत आलेल्या समर्थकांना संबोधित करतील.

नक्की वाचा >> Dasara Melava: “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा”

दुसरीकडे दादरमधील शिवाजी पार्कवरही गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साडेसात वाजता आपल्या ‘मातोश्री’ या निवासस्थानावरुन निघतील. ‘मातोश्री’ ते शिवाजी पार्क हा प्रवास १५ मिनिटांचा आहे. उद्धव हे पावणेआठला सभास्थळी पोहोचतील. साधारण आठ वाजण्याच्या आसपास उद्धव यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे, असं ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “संध्याकाळपर्यंत…”

शिवाजी पार्कची क्षमता ही अंदाजे ८० हजार इतकी आहे. तर बीकेसीमधील मैदानाची क्षमता ही शिवाजी पार्कच्या दुप्पट म्हणजेच दीड लाखांहून अधिक आहे. दोन्ही मैदानांमध्ये दुपारी एकपासूनच समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dasara melava 2022 updates timings of cm eknath shinde speech at bkc uddhav thackeray speech at shivaji park dadar scsg
First published on: 05-10-2022 at 17:03 IST