मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटाचा दसरा मेळावा बुधवारी बीकेसीच्या मैदानावर पार पडला. या मेळाव्यातील भाषणामध्ये शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. त्याप्रमाणे शिंदेंनी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टीका केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान असल्याचंही शिंदेंनी म्हटलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या याच भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मीटकरी यांनी भाषणाची स्क्रीप्ट ही भाजपाची असल्याचा टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

दसऱ्याच्या दिवशी सकाळीच पंकजा मुंडे यांचा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मिटकरींनी भाजपाला टोला लगावला होता. ट्वीटरवरुन त्यांनी ‘भाजपाचा केमिकल लोच्या झाला आहे,’ असं म्हटलं होतं. भाजपाला पंकजा मुंडे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यातही स्थान मिळालं नाही असा टोला मिटकरींनी लगावला होता. “एक मात्र खरे की दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाचा ‘केमिकल लोच्या’ झाला. ना शिंदे गटाच्या मेळाव्यात स्थान, ना पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात, ना शिवतीर्थावर.. भाजपारूपी इतरांची घरे फोडणारा दशासान भविष्यात असाच मातीत मिसळणार हे नक्की,” असं ट्वीट मिटकरींनी केलेलं.

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा
Solapur ram Satpute
सोलापुरात भाजप उमेदवार सातपुतेंच्या गाठीभेटी सुरू, काशी जगद्गुरूंचे घेतले आशीर्वाद

नक्की वाचा >> Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विचार ही नाही आणि…”

मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरु असतानाच मिटकरींनी ट्वीटरवरुन शिंदेंना टोला लगावला. रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी केलेल्या ट्वीटमध्ये मिटकरींनी, “मुख्यमंत्री महोदयांचे आजचे बीकेसी मैदानावरील भाषण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली स्क्रिप्ट. या भाषणात नरेंद्रजी मोदी, आरएसएस व भारतीय जनता पार्टीवर स्तुती सुमने तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेवर आगपाखड त्यापलीकडे काहीच नाही,” असा टोलाही लगावला.

नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

नक्की वाचा >> Dasara Melava: CM शिंदेंचं ‘ते’ एक वाक्य अमृता फडणवीसांना फारच आवडलं; कौतुकाचा वर्षाव करत म्हणाल्या, “आपल्या राज्याला जो…”

एकानाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबरोबरच आदित्य ठाकरेंवरही टीका करताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुकल्याचं दिसून आलं. एकूणच शिंदेंचं भाषण आणि त्यामधील मुद्दे पाहता भविष्यात शिंदे गटाची वाटचाल भाजपासोबतच असणार हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे.