दसरा मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया देताना नारायण राणे संतापून म्हणाले, "राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर उद्धव ठाकरे..." | Dasara Melava Narayan Rane First Comment on Uddhav Thackeray Rally Slams Shivsena chief scsg 91 | Loksatta

दसरा मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया देताना नारायण राणे संतापून म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर उद्धव ठाकरे…”

मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आपली भूमिका मांडली.

दसरा मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया देताना नारायण राणे संतापून म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर उद्धव ठाकरे…”
मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली टीका

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर टीका करताना नारायण राणेंनी आम्ही आमच्या नेत्यांबद्दल वाईट ऐकून घेणार नाही असा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला तर यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार असतील असं राणेंनी म्हटलं आहे.

मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये थेट शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन भाष्य करताना राणेंनी या मेळाव्यातील वक्त्यांवरही टीका केली. वक्त्यांची यादी पाहिल्यावर वैचारिक स्तर घसरल्याचं जाणवलं, असं राणे म्हणाले. तसेच भाजपा आणि शिंदेवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा पक्षातील कामाचा अनुभव काय आहे असा सवालही राणेंनी विचारला. या लोकांना फक्त नारायण राणेंवर बोलण्यासाठी आणलं होतं, असा टोलाही नारायण राणेंनी लगावला. त्यांच्या टीकेचा रोख सुष्मा अंधारे यांनी केलेल्या टीकेच्या दिशेने होते.

उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या मेळाव्यावर टीका करताना, “हा मेळावा झाला यात पोकळ वल्गना आणि शिळ्या कढीला उत याशिवाय काही नव्हतं. तोंड बंद नाही केलं आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर जबाबदार उद्धव ठाकरे असतील. आम्ही आमच्या नेत्यांबद्दल ऐकून घेणार नाही,” असा इशारा राणेंनी दिला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याविषय उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानांवर भाष्य करताना राणेंनी उद्धव यांचा एकेरी उल्लेख करत, “काय म्हणाला तो, अमित शाहा म्हणून या राज्यातून त्या राज्यात जातात. तुम्ही ३७० हटवलं का काश्मीरमधून? देशातील लोकांना कोण संभाळतंय थोडी तरी मर्यादा बाळगा,” असा टोला लगावला. तसेच उद्धव ठाकरेंनी मेळाव्यातील भाषणादरम्यान अद्यापही डॉक्टरांनी आपल्याला वाकण्यासाठी परवानगी दिलेली नाही असं सांगितलं. याचा संदर्भ घेत राणेंनी, “वाकायला पण डॉक्टर लागतो मग तू काय काम करणार?” असा टोला लगावला.

“परवाच्या मेळाव्यात केलेली टीका ही केलेल्या उपकारांची परतफेड आहे. २०१९ ला मोदींचं नाव आणि फोटो लावून खासदारकी आणि आमदारकीची निवडणूक लढली. मोदींच्या नावावर निवडून आले आणि त्यांच्यावर टीका करता,” असं म्हणत राणेंनी संताप व्यक्त केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Mumbai Rains: ठाण्यात वीजांच्या कडकडाटसह तुफान पाऊस; मुंबई, डोंबिवली, नवी मुंबईतही कोसळला, तासभर जोरदार बरसणार

संबंधित बातम्या

गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचा राडा, घोषणाबाजी करत अंगावर शाईफेक
जयंत पाटलांच्या चिरंजीवांच्या शाही विवाहाची लगबग! ; दोन लाख लग्नपत्रिका; अतिभव्य मंडप
VIDEO : आता २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांचा राज्यपालांकडून अवमान? व्हिडिओ शेअर करत काँग्रेसकडून टीका
Guwahati Visit: गुवाहाटी दौऱ्याला अब्दुल सत्तार गैरहजर; नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण देत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांवर माझा…”
“गुवाहाटीहून परत येताना आमच्यासोबत…”, उदय सामंतांचा मोठा दावा; ठाकरे गटाची चिंता वाढणार?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
भारतीय संविधान दिनानिमित्त गौरव मोरेने दिली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खास मानवंदना, व्हिडीओ व्हायरल
महिलांच्या कपड्यांविषयीच्या ‘त्या’ विधानामुळे रामदेव बाबा अडचणीत; महिला आयोगानं पाठवली नोटीस, दोन दिवसांत…
“माझ्या आयुष्यातील…”; हृतिक रोशनच्या बहिणीबरोबरबरोबर रंगत असलेल्या अफेअरच्या चर्चांवर कार्तिक आर्यनने सोडलं मौन
विश्लेषण : जिल्हा किंवा तालुक्याला न जाता गावातच लढवता येतो खटला, काय आहे ‘ग्राम न्यायालय’? वाचा सविस्तर
१७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध कॅनडियन पॉप स्टारला १३ वर्षं कठोर करावासाची शिक्षा