शिवसेनेकडून दरवऱ्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित राहतात. मात्र करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने भरवण्यात आला होता. यंदाच्या वर्षी मात्र ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन पद्धतीने हा दसरा मेळावा होणार आहे. जागा मात्र शिवतीर्थ नव्हे तर वेगळीच असेल.

दसरा मेळाव्याच्या जागेबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर यापूर्वीचे दसरा मेळावे होत असत. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. तर यावर्षी हॉलमध्ये ५० टक्के उपस्थितीत हा मेळावा साजरा होणार आहे.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

शिवसेनेचा दसरा मेळावा हा पक्षापुरता मर्यादित नसून त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा १९६६ साली झाला होता. त्यानंतर पाऊस आणि करोना काळ अशा मोजक्या घटनांचा अपवाद वगळता सातत्याने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेची विविध विषयांवरचे धोरण यांवर भाष्य हे या मेळाव्यात केलं जातं, मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली जाते. यामुळेच राजकीय वर्तुळातही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत उत्सुकता असते.