शिवसेनेकडून दरवऱ्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित राहतात. मात्र करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने भरवण्यात आला होता. यंदाच्या वर्षी मात्र ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन पद्धतीने हा दसरा मेळावा होणार आहे. जागा मात्र शिवतीर्थ नव्हे तर वेगळीच असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दसरा मेळाव्याच्या जागेबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर यापूर्वीचे दसरा मेळावे होत असत. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. तर यावर्षी हॉलमध्ये ५० टक्के उपस्थितीत हा मेळावा साजरा होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dasara melawa by shivsena in mumbai destination fixed vsk
First published on: 11-10-2021 at 10:12 IST