मुंबई : मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल. मध्य रेल्वे मुख्य मार्गिकाकुठे : माटुंगा - मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरकधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हेही वाचा.SC on Mumbai College Hijab Ban: मुंबईतील महाविद्यालयाच्या हिजाब बंदीला स्थगिती; ‘टिळा, टिकलीला परवानगी का?’, सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा - मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांत थांबतील. तर, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांत लोकल थांबणार नाही. हार्बर मार्ग कुठे : सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरकधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० पर्यंत हेही वाचा.निम्म्याहून अधिक घरांचा ताबा नववर्षात ? म्हाडाची सोडत सप्टेंबरमध्ये; १,३२७ सदनिका निर्माणाधीन प्रकल्पातील परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी - गोरेगाव / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत कुर्ला - पनवेलदरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.