उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतील करु इच्छितो. त्यामुळे आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी स्वत: प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून सोमवारी ( २३ जानेवारी ) ही माहिती दिली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’मध्ये बोलत होते.

“गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यपाल खासगीत सांगत आहे, मला परत जायचं आहे. माझी तब्येतही साथ देत नाही आहे. हे सरकार यायच्या आधीपासून राज्यपाल परत जायचं म्हणत आहेत. राज्यपालांना कोणीही राजीनामा देण्यास सांगितलं नाही. राज्यपाल ५ वर्षे राहू शकतात, कोणीही त्यांना राजीनामा मागितला नाही. पण, राज्यपालांनी स्वत:हा पंतप्रधानांना सांगितलं आहे, यापुढे काम करण्यास इच्छूक नाही. मला परत गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही मला राजीनामा देण्याची परवानगी द्यावी,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले.

Jitendra-Awhad
“निवृत्त न्यायाधीशांनाही कळू लागले आहे की…”, ‘त्या’ पत्रावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
Narendra modi
Vision 2047 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पुढच्या २५ वर्षांचं नियोजन, म्हणाले, “१५ लाखांहून अधिक…”
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?

हेही वाचा : “ज्यांना स्वत:च्या आयुष्यात, कुटुंबात, पक्षात आणि सरकारमध्ये सलग अपयश आलं त्यांनी…” उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांकडून प्रत्युत्तर!

राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र न लिहता राष्ट्रपतींना लिहायला हवं होतं, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “राजीनामा दिल्यावर राष्ट्रपतींनाच कळवणार आहे. राज्यपालांना पायउतार व्हायचं तेव्हा चर्चा करुन ते निर्णय घेणार. कारण, राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती चर्चा करुनच करतात. त्याची प्रक्रिया म्हणजे पंतप्रधानांना पत्र लिहणं आहे. तसेच, राज्यपाल हे व्यक्ती असून, पंतप्रधानांचा सल्ला घेणं गैर नाही आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेत स्वयराचार करायचा होता, तो राज्यपालांनी करु दिला नाही. त्यामुळे राज्यपालांना लक्ष्य करण्यात आलं,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.