scorecardresearch

मुंबई: आरेमध्ये बिबट्याचा मृतदेह आढळला

आरे येथील युनिट क्रमांक ४ मधील पाड्यातील गोठ्याच्या परिसरात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला.

leopard
संग्रहित छायाचित्र

आरे येथील युनिट क्रमांक ४ मधील पाड्यातील गोठ्याच्या परिसरात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

हेही वाचा >>>मुंबई: अखेर पीडित महिलेची मृत्यूशी झुंज संपली; अँसिड हल्ला झालेल्या ५४ वर्षीय पीडित महिलेचा १८ दिवसांनी रुग्णालयात मृत्यू

बछड्याचे अंदाजे वय पाच महिने असून प्राथमिक अंदाजानुसार बछड्यावर भटक्या कुत्र्यांनी किंवा नर बिबट्याने हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तसेच, प्राथमिक चौकशीत याप्रकरणी गुन्हा दाखल होईल, अशी माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 13:56 IST
ताज्या बातम्या