आरे येथील युनिट क्रमांक ४ मधील पाड्यातील गोठ्याच्या परिसरात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
बछड्याचे अंदाजे वय पाच महिने असून प्राथमिक अंदाजानुसार बछड्यावर भटक्या कुत्र्यांनी किंवा नर बिबट्याने हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तसेच, प्राथमिक चौकशीत याप्रकरणी गुन्हा दाखल होईल, अशी माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली