scorecardresearch

Premium

रुग्णालयातील शौचालयात मृत नवजात बालिका, शीव रुग्णालयातील प्रकार

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शौचालयातील कचऱ्यात नवजात बालिका सापडल्यामुळे शुक्रवारी सकाळी रुग्णालयात खळबळ उडाली.

dead newborn girl in a hospital toilet
अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शौचालयातील कचऱ्यात नवजात बालिका सापडल्यामुळे शुक्रवारी सकाळी रुग्णालयात खळबळ उडाली. अर्भकाला तात्काळ तेथील डॉक्टरांनी तपासले असता तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी शीव पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत.

case of receiving bribe by treating him under government scheme Bribery doctor in private hospital taken into police custody
खासगी रुग्णालयातील लाचखोर डॉक्टरांना पोलीस कोठडी, शासकीय योजनेत उपचार करून लाच घेतल्याचे प्रकरण
hospitals of Mumbai Municipal Corporation will be illuminated with the light of biogas
बायोगॅसच्या प्रकाशाने मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये उजळणार
Wildfire in Deccan College premises
पुणे : डेक्कन कॉलेजच्या आवारात वणवा
Theft of doctors vehicles in Government Medical College and Hospital in Nagpur
नागपुरातील मेडिकलमध्ये डॉक्टरांच्याच वाहनांची चोरी…

सफाई कामगार सरस्वती डोंगरे (३६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील अपघात विभागातील शौचालयात शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास डोंगरे या कचरा गोळा करण्यासाठी गेल्या. तेव्हा, कचऱ्याची बादली जड वाटली म्हणून त्यांनी उघडून पाहताच त्यातील काळ्या रंगाच्या पिशवीत अर्भक मिळून आले. त्यांनी, तत्काळ त्याबाबत वरिष्ठांना कळवले.

आणखी वाचा-मुंबई : गटाराचे काम सुरू असताना महानगर गॅस वाहिनीला गळती

डॉक्टरांनी तेथे धाव घेऊन वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर बाळाला मृत घोषित केले. कोणीतरी बाळ नको असल्याने तेथे फेकून दिले असावे. व त्याच, कारणातून बालिकेचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. मृत बाळ एका दिवसांचे होते. बालिकेचे पालकत्त्व नाकारून फेकल्याप्रकरणी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे शीव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dead new born girl in a hospital toilet case of sion hospital mumbai print news mrj

First published on: 08-12-2023 at 21:44 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×