मुंबई : कांदिवली येथील चारकोप, सेक्टर १० परिसरात शनिवारी पर्यावरणप्रेमींनी स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान परिसरात अनेक मृत कासव आढळली. पर्यावरणप्रेमी कांदिवली परिसरात सातत्याने स्वच्छता मोहीम राबवित आहेत. मात्र करोनामुळे स्वच्छता मोहिमेत खंड पडला होता. या परिसरात ९ जूनपासून पुन्हा स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली.

कांदिवली येथील चारकोप सेक्टर १० परिसरात शनिवारी स्वच्छता मोहीम सुरू असताना अनेक मृत कासव, त्याचबरोबर मासे आढळले. जलचरांच्या मृत्युमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण, तसेच पाण्यात विषारी घटक असल्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी वर्तविली आहे. दरम्यान, या स्वच्छता मोहिमेत पर्यावरणप्रेमींबरोबर एनएसएस, महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी झाले होते. त्यांच्या मदतीने कांदळवन, तसेच अन्य परिसरात स्वच्छता करण्यात येते. या मोहिमेदरम्यान प्लास्टिकचा कचरा, काचेच्या बाटल्या आदी वस्तू मोठ्या प्रमाणात आढळल्या. परिणामी, त्याचा प्राण्यांना त्रास होत असल्याचे स्वच्छता मोहिमेत सहभागी मिली शेट्टी यांनी सांगितले.

Mumbai, cyber fraud, Rs 44 lakh, stock market scam, Facebook, Jambin app, Prevention of Information Technology Act, Central Regional Cyber Police, share trading, bank manager,
मुंबई : महिलेची ४४ लाखांची सायबर फसवणूक
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Mumbai, Narcotics Control Bureau, ganja seizure, codeine bottles, inter-state gang, arrests, Rs 2 crore, Ulhasnagar, Bhiwandi, Narcotics Control Act,
मुंबई : ७५ किलो गांजा व ४८०० कोडीनच्या बाटल्या जप्त, सहा जणांना अटक
samruddhi mahamarg expansion from igatpuri to vadhavan port
वाढवणला ‘समृद्धी’; राज्यातून समृद्धी महामार्गाने वाढवणला जलद येण्यासाठी इगतपुरीपासून नवा मार्ग
Mumbai Metro 7 a Pothole
Mumbai Metro : मुंबई मेट्रोचं काम सुरू असताना रस्त्याचा भाग खचला, कंत्राटदाराकडून रहिवाशांची थेट फाईव्ह स्टॉर हॉटेलमध्ये सोय!
mumbai police ganesh festival 2024
Ganesh Festival 2024: “मिरवणुकीत गणवेशात नाचू नका, नाहीतर…”, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश जारी; कारवाईचा इशारा!
Mumbai, Western Railway, heart attack, Automated External Defibrillator (AED),
रेल्वे स्थानकात हृदयविकाराचा झटका आल्यास तात्काळ प्रथमोपचार
Mumbai, harghar tiranga, Independence Day, tricolor flags, Mumbai Municipal Corporation, national flag distribution, Tricolor Yatra,
मुंबई : घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी सुमारे साडेतीन कोटी खर्च, महापालिकेच्या प्रत्येक विभागाला १२ लाख रुपये निधी देणार

हेही वाचा…रेल्वे स्थानकात हृदयविकाराचा झटका आल्यास तात्काळ प्रथमोपचार

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऐरोली खाडी किनाऱ्यावर मृतावस्थेत हजारो मासे आढळले होते. वाढती उष्णता आणि रासायनिक प्रदुषणामुळे हा प्रकार घडला, असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. असा प्रकार दरवर्षी होत असून पर्यावरणप्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.