मुंबई : अमलीपदार्थ न दिल्याने संतप्त झालेल्या एका तृतीयपंथीने ३४ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात वास्तव्यास असलेला अतिक अन्सारी अंमलीपदार्थांच्या आहारी गेला होता. तो मंगळवारी अंमलीपदार्थ सेवन करीत असताना तृतीयपंथी सुमित्रा उर्फ चिन्नी (३१) तेथे आला. चिन्नीने अतिककडे अंमलीपदार्थाची मागणी केली. मात्र अतिकने ते देण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. या मारामारीत अतिक गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी अतिकला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अतिकच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी चिन्नीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Supriya sule and pankaja Munde
Supriya Sule : “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, “कोणताही जिल्हा…”
Youth beaten with knife and koyta in Rahatani Two arrested
पिंपरी : रहाटणीत तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण; दोघे अटकेत, तिघांविरोधात गुन्हा
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
student physically assaulted, government hostel ,
बुलढाणा : शासकीय वसतिगृहेदेखील असुरक्षित! अधीक्षकाचा विद्यार्थ्यावर अत्याचार
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक
Story img Loader