मुंबईः कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे. भरधाव वेगात धावणाऱ्या बेस्टच्या बसने सोमवारी रात्री कुर्ला परिसरात अनेकांना धडक दिली होती. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले होते. सात जणांचा मृत्यू झाला आहे.

कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. अखेर ही बस एका भिंतीवर आदळली. या अपघातात ४९ जण जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ सर्व जखमींना कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा आणि इतर खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

Mumbai Nashik highway accident near Gogethar killed three including couple from Amalner
अमळनेरमधील दाम्पत्याचा शहापूरजवळील अपघातात मृत्यू
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय

हेही वाचा – मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

हेही वाचा – Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक

अपजल रसूल (१९), आझम शेख (२०), कानिफ कादरी (५५), शिवम काशिम (१८) अशी मृतांची ओळख पटली आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातानंतर कुर्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी रात्रीच बसचालक संजय मोरेला ताब्यात घेतले. पोलिसांनी रात्री उशिरा त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुर्ला पश्चिम परिसरात रात्रभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय कुर्ला पश्चिम येथील बेस्ट आगारही रात्रीच बंद करण्यात आले.

Story img Loader