मुंबई : पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करायची असेल तर, भाजपला पराभूत करावे लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते  आणि राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त के ली.

केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. काही राज्यातींल लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला. त्यामुळेच इंधन दर कमी के ल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हाच संदर्भ देत भाजपला तुम्ही जितका वेळ पराभूत कराल, तितके  पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होत राहणार, असे मलिक यांनी म्हटले आहे.