मुंबई : देवनार कत्तलखान्याच्या नूतनीकरणासाठी काढलेली निविदा एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या फायद्यासाठी असून ती तातडीने रद्द करून नव्याने काढावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा यांनी  केली. ही मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.  या निविदा प्रक्रियेत काही मंत्री व त्यांच्या निकटवर्तीयांना किमान १६० कोटी रुपयांचा मलिदा मिळणार असल्याचा आरोपही आमदार कोटेचा यांनी केला. 

देवनार कत्तलखान्याच्या नूतनीकरणासाठी ४०० कोटी रुपयांची निविदा अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या कत्तलखान्यात दररोज ५०० ते ६०० जनावरांची कत्तल केली जाते. नूतनीकरण निविदा भरण्यासाठी दररोज सुमारे २५  हजार जनावरांची कत्तल करण्याचा अनुभव हवा, अशी अट घालण्यात आली आहे. संपूर्ण देशात या अटीत बसू शकणारी एकही कंपनी नाही. ही निविदा प्रसिद्ध होण्याच्या आधीच अहमदनगर येथील एका कंपनीने १०० कोटी रुपयांची यंत्रसामग्री कोरियामधून आणण्यासाठी मागणी नोंदविली  आहे असे त्यांनी सांगितले.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
youth from pune who worked in merchant navy missing
मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरूण बेपत्ता… झाले काय?
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश