सुटी सिगारेट आणि तंबाखुजन्य वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या, तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यावरील दंडाची रक्कम २० रुपये रुपये करण्याच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार बोकाळेल, तसेच किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी येईल. त्यामुळे तंबाखुजन्य वस्तू आणि सिगारेट संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी निवंती हिंद मजदूर सभा आणि मुंबई वीडी तंबाखू व्यापारी संघातर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात नवी दिल्ली येथे लवकरच देशव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.