दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना बुऱ्हानुद्दिन यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी मलबारहिल येथे आणि रिपब्लिकन नेते नामदेव ढसाळ यांच्यावर अंत्यसंस्काराच्या वेळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत झालेल्या चेंगराचेंगरीची प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.
सय्यदना यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर लाखो अनुयायी येतील, याची कल्पना पोलीस अधिकाऱ्यांना असणे गरजेचे होते. पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी ती नि:पक्षपाती होण्यासाठी प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून झाली पाहिजे, असे तावडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
चेंगराचेंगरीची चौकशी प्रधान सचिवांकडून करण्याची मागणी
दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना बुऱ्हानुद्दिन यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी मलबारहिल येथे आणि रिपब्लिकन नेते नामदेव ढसाळ यांच्यावर
First published on: 22-01-2014 at 12:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demanded of mumbai stampede inquiry by the chief secretary