मुंबई : राज्याच्या आर्थिक स्थितीचा मार्च २०२२ अखेर आढावा घेऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करणे, निवृत्ती वेतन योजनेत केंद्राप्रमाणे सुधारणा करण्यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा योग्य विचार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर बुधवारपासूनचा दोन दिवसीय संप मागे घेण्याची तयारी कर्मचारी संघटनांनी दर्शवली आहे. कर्मचारी संघटनांमधील पदाधिकाऱ्यांची बुधवारी चर्चा होईल व त्यानंतर संप मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटना घोषणा करतील. नोकरभरती, जुनी निवृत्ती योजना आणि निवृत्तीचे वय वाढवणे आदी विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी व गुरुवारी संपाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात व सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. मागण्यांबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिल़े

Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया
Why Protests in Hong Kong over New National Security Law Approved by Legislative Council Hong Kong
चीनकडून हाँगकाँगची गळचेपी? नवीन सुरक्षा कायद्याविषयी जगभर निषेधसूर का?