मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेल्या साडेसहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे निवडणूक आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झाला नसल्याचे स्पष्टीकरण सोमवारी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. स्मार्ट सिटी योजनेची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात नव्याने कोणतीही घोषणा केली नाही.

नक्की वाचा:- विमान उड्डाणाची खोटी माहिती देणाऱयांवर बदनामीचा खटला भरणार – फडणवीस

जुन्या योजनांची अंमलबजावणी झाल्यास कल्याण-डोंबिवलीकरांना भविष्यात कशाप्रकारे फायदा होईल, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. यामध्ये निवडणूक आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही. मात्र, तरीही काँग्रेसला निवडणूक आयोगाकडे तक्रार करायचीच असेल तर त्यांनी ती करावी.

आम्ही त्यांच्या नोटीसला योग्य ते उत्तर देऊ. काँग्रेसला या निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्याकडून असे प्रकार करण्यात येत असल्याचे दानवेंनी यावेळी सांगितले.