राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डिझायनर अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. मला अडचणीत आणण्यासाठीच हा प्रयत्न केलाचा दावा, देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती असून, तो सात आठ वर्ष झालं फरार आहे. त्याच्यावर १४ ते १५ गुन्हे दाखल आहेत. याची एक मुलगी २०१५-१६ दरम्यान पत्नीला भेटत होती. नंतर अचानक भेटणं बंद झालं. २०२१ साली पुन्हा तिने पत्नीला भेटणं चालू केलं. तेव्हा तिने सांगण्यास चालू केलं, मी डिझायनर आहे, कपडे आणि दागिने तयार करते. विश्वास संपादन करण्यासाठी तिच्या आईचं एक पुस्तकही तिने प्रकाशन करून घेतलं.”

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

हेही वाचा : १ कोटींची लाच, धमकी आणि कट रचल्याचा आरोप, अमृता फडणवीसांची डिझायनरविरोधात मुंबईत तक्रार; नेमकं प्रकरण काय?

“एक दिवशी तिनं सांगितलं, माझ्या वडिलांना काही चुकीच्या गुन्हा अडकवण्यात आलं आहे, त्यांना सोडवा. त्यावर पत्नीने काही असेल तर मला निवेदन देण्यास सुचवलं. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी १ कोटी रुपयांची ऑफर दिली. मात्र, चुकीचं अडकले असतील, तर पोलिसांकडून सोडवता येईल, असं पत्नी म्हणाली. पण, तिने सातत्याने बुकींचा विषय काढल्यावर पत्नीने तिला फोनवर ब्लॉक केलं. ब्लॉक केल्यावर दोन दिवसांनी अनोळखी नंबरवरून काही व्हिडीओ आणि क्लीप आल्या,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

“यातील एक व्हिडीओ गंभीर होता. त्यात ही मुलगी बाहेर कुठेतरी बॅगेत पैसे भरत आहे. दुसऱ्या व्हिडीओत ती मुलगी आमच्या घरातील महिला कर्मचाऱ्याला बॅग देताना दिसत आहे. नंतर पत्नीला त्या व्यक्तीने धमकी दिली की, हे व्हिडीओ आम्ही व्हायरल करू. माझे सर्व पक्षाशी संबंध आहेत. त्यामुळे आम्हाला मदत करत तात्काळ केसेस परत घेण्याची कारवाई करा. ही गोष्ट पत्नीने सांगितल्यावर आम्ही तातडीने गुन्हा दाखल केला,” असे फडणवीसांनी म्हटलं.

“परंतु, नंतर त्याने पत्नीजवळ मान्य केलं की, माझ्यावरील गुन्हे परत घ्यायचे आहेत, मला मदत करा. व्हिडीओ कुठेच व्हायरल करणार नाही. त्याला वाटत होतं, याची माहिती मला आणि पोलिसांना नाही आहे. तेव्हा काही पोलिसांनी आणि नेत्यांची नावं त्याने घेतली. तर, तिच्या मुलीने बोलताना म्हटलं, मागील आयुक्तांच्या काळात आमचे गुन्हे मागे घेण्याचा कारवाई सुरू झाली होती. पण, तुमचं सरकार आल्यावर ती थांबली. बोलताना तिने संकेत दिले, कसे हे तिला करायला सांगितलं,” असा धक्कादायक खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला.

हेही वाचा : एकीकडे जुन्या पेन्शन योजनेची मागणी, दुसरीकडे लोकप्रतिनीधींच्या पगारावर टीका; संजय गायकवाड म्हणाले “आमदारांना कार्यकर्त्यांची लग्नं…”

“सध्या तो आरोपी पाच ते सहा वर्ष झालं फरार आहे. कदाचित मुलगी सापडणार नाही. मात्र, मला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला, हे वारंवार सांगत होतो. तसेच, माझ्या कुटुंबाबतही काही चाललं आहे, याची मला शंका होती,” असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.