राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज(सोमवार) सकाळी पुण्यात माध्यमांशी बोलताना, “सत्ता गेल्यानतंर काही लोक अस्वस्थ होतात. सगळे काय माझ्यासारखे नसतात.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. त्यानंतर काही वेळातच भाजपा कार्यालयातील पत्रकारपरिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांना यावरून प्रत्युत्तर दिलं.

“जेव्हा गोष्टी जुन्या होतात, तेव्हा लोक विसरतात आणि सोयीच्या गोष्टी लक्षात ठेवतात. कोणी सरकार पाडलं मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं? मग पुन्हा काँग्रेसचं सरकार कोणी पाडलं? मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं? याचा इतिहास हा सगळ्यांनी बघितला आहे. अशाप्रकारे सरकारं पाडणं, काँग्रेस बाहेर पडणं, काँग्रेसमध्ये जाणं. अस्वस्थतेशिवाय थोडी होतं. कोणी स्वस्थ बसला आणि मॅच पाहतोय, तो थोडीच असं करतो. त्यामुळे काळजीचं कारण नाही, मी एकाच पक्षात आहे आणि माझा पक्ष सत्तेवर येणारच आहे. मला चिंता नाही.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार…,”, शरद पवारांकडून फडणवीसांना टोला; म्हणाले “सगळे माझ्यासारखे नसतात”

भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लागण्याची मागणी होत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता शरद पवार म्हणाले होते की, “सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय माझ्यासारखे नसतात. १९८० मध्ये माझं सरकार बर्खास्त केलं. रात्री १२.३० वाजता मुख्य सचिवांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर तीन चार मित्रांना बोलावलं आणि घरातल सामान आवरलं. सकाळी ७ वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो, सरकारी गाडी सोडली. त्यादिवशी इंग्लंड आणि भारताचा सामना होता. १० वाजता वानखेडेवर सामना पाहण्यासाठी गेलो आणि दिवसभर सामन्याचा आनंद लुटला”.

“जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल, तर …”; फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा!

भाजपाच्या आजच्या पत्रकारपरिषदेस केंद्रीयमंत्री नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये आदींसह भाजपा नेत्यांची उपस्थिती होती.